मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी काही महत्वपूर्ण सुचना केल्या असून, नागरिकांनी नोकरीच ठिकाण आणि तातडीची वैद्यकीय मदतिची गरज, या दोन कारणा व्यतिरिक्त नागरिकांनी शुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडू नये ,असं आवाहन केलं आहे.
तुम्ही बिहार, दिल्ली कडे पहा महाराष्ट्राच्या विकासाचं काय ते आम्ही पाहू, सामनातून गडकरींना टोला
कार्यालयात जाणारे आणि तातडीच्या वैद्यकीय कारणासाठीच परवानगी दिली जाईल. खरेदीच्या कारणासाठी दोन किलोमीटर परिघाबाहेर जाणं निषिद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
वैयक्तिक सुरक्षा आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचं कोटेकोर पालन करावं. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. दोन किलोमीटरच्या परिघात मोकळ्या जागांवर व्यायामासाठी बाहेर पडण्यालाही सक्त मनाई आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षा घेणे शक्य – राज्यपाल
भाजी, किराणा खरेदी आणि सकाळी व्यायामासाठीही 2 किलोमीटर परिसराच्या आतच फिराव, केवळ मौजमजेसाठी अथवा विनाकारण खरेदीसाठी बाहेर घराबाहेर पडू नये अशी सूचनाही पोलिसांनी केली आहे. दरम्यान, टाळेबंदीचे हे नियम मोडून विनाकारण फिरणाऱ्या 6 हजार 800 नागरिकांची वाहने काल मुंबई पोलिसांनी विविध भागातून जप्त केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

