Share

…तर चीनविषयी माझ्याएवढा कठोर कोणीही असणार नाही, ट्रम्प चीनवर भडकले

Published On: 

वॉशिंग्टन : करोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून चीनने व्यापार करारातील आपत्तीच्या कलमाचा आदर केला नाही, तर व्यापार करार रद्द करण्यात येईल, अशी थेट धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

दुसरीकडे चीनविरोधात माझ्याएवढी कठोर भूमिका कोणीच घेऊ शकत नाही. मी अध्यक्ष होईपर्यंत ते अमेरिकेला फसवत होते; पण आता परिस्थिती बदलली आहे. अनेक अकल्पनीय गोष्टी घडत असून, सध्याचा अदृश्य शत्रू कोठून आला आहे, हे सर्वांना माहीत आहे. चीनविषयी माझ्याएवढा कठोर कोणीही असणार नाही.’ असा सरळ दम डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला भरला आहे.

आयात-निर्यातीतील तफावतीमुळे, ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवरील आयातशुल्कामध्ये वाढ केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये जानेवारीत व्यापार करार झाला. त्यानुसार चीनला अमेरिकेतील २०० अब्ज डॉलरची उत्पादने आयात करावी लागणार आहेत. ‘एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा अकल्पनीय घटना घडल्यानंतर, दोन्ही देशांमध्ये नव्याने व्यापार चर्चा होईल,’ असे एक कलम या करारामध्ये ठेवण्यात आले होते.

मात्र, चीन हे कलम रद्द करू शकते, असा अहवाल अमेरिका-चीन आर्थिक व सुरक्षा आढावा आयोगाने सादर केला आहे. त्यावर ट्रम्प म्हणाले, ‘चीनने हे कलम रद्द केले, तर आम्ही त्यांच्याबरोबरील करारच रद्द करू शकतो. अस ट्रम्प म्हणाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!