वर्धा : वर्ध्यात नगरपालिकेच्या विविध कामाच्या ई भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलत असतांना भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये खळबळजनक खुलासा केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचे नाव आपण मृत्यूपत्रामध्ये लिहलेले आहे, असे मेघे म्हणाले. दरम्यान, यावेळी गडकरी यांच्या हस्ते नगरपालिकेच्या कामांचे ई भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’गडकरी हे आमच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत. मृत्यूपत्रात कुठं काही घोळ होऊ नये यासाठी आपण मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं आहे. देशातील नेतृत्व दिवस रात्र काम करुन या देशाचा विकास झाला पाहिजे यासाठी झटत आहे. गडकरी हे देशातील प्रत्येक राज्यामध्ये जाऊन काम करत आहेत,’ असे मेघे म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला नितीन गडकरींबरोबरच खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरीता गाखरे, नगराध्यक्ष अतुल तराळे तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’

