Share

‘…म्हणून मला महाराष्ट्रात यायचा निर्णय घ्यावा लागला’, शरद पवारांचा खुलासा

Published On: 

पुणे : बुधवारी(२९ डिसें.)‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बोलत असतांना राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनी त्यांना महाराष्ट्रात का यावे लागले. यासंदर्भात खुलासा केला आहे.

यासंदर्भात बोलत असतांना पवार म्हणाले की,’मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढली. तेव्हा मी स्वतः सीताराम केसरी यांच्यासमोर उभं राहिलो, पण उत्तर भारतातील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सीताराम केसरी यांना पाठिंबा दिला तर दक्षिण भारतातील सहकाऱ्यांनी मला पाठिंबा दिला. पुढे त्यांनी सांगितले की,’त्याकाळी बाबरी मशिदीचा समोर प्रश्न आला आणि त्यानंतर दंगली झाल्या. तेव्हा मी संरक्षण मंत्री होतो आणि मला तुम्ही महाराष्ट्रात असला पाहिजे असे सांगण्यात आले होते. मी आलो, पण माझ्या लक्षात आलं की अशा संघर्षात निर्णय घेणारी ऑथिरिटी एकच असली पाहिजे. त्यामुळे या सर्वांचे परिणाम मी नरसिंहराव यांना कळविले आणि मी पुन्हा दिल्लीला गेलो.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’त्यानंतरही माझी दिल्लीतून महाराष्ट्रात जायची अजिबात इच्छा नव्हती. परंतु तेव्हा मला ज्या राज्यात तुम्ही वाढला, ज्या राज्यातून तुम्ही इथपर्यंत आलात ते राज्य जळतंय. अशावेळी तुम्ही जबाबदारी घेत नसाल तर याचं आम्हाला दुःख होतं, अशा भावनिक गोष्टी सांगण्यात आल्या. त्यामुळेच मला महाराष्ट्रात यायचा निर्णय घ्यावा लागला,’ असे पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!