🕒 1 min read
नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानने भारतावर आरोप केले. मात्र भारताच्या महिला सचिव भारतीय विदेश सेवा (आयएफएस) अधिकारी स्नेहा दुबे यांनी भारताची बाजू मांडत पाकिस्तानला खडे बोल सुनावले. त्यावर आज तकच्या अँकर आणि रिपोर्टर अंजना कश्यप या स्नेहा दुबे यांची पूर्व परवानगी न घेता दुबे यांच्या कॅबीनमध्ये पोहचल्या आणि स्नेहा दुबे यांनी अंजना कश्यप यांना बाहेरचा रस्ता दाखविला. हे दृश्य आज तक चॅनलवर लाईव्ह दाखविण्यात आले. यामुळे अंजना कश्यम सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत.
यावेळी स्नेहा दुबे म्हणाल्या, आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहिलं. सध्याच्या जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणं स्वीकार करण्याची गोष्ट नाही आहे. यासह आदी मुद्यांवर त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
2 साल बाद फिर गूंजा अमेरिका में 'मोदी-मोदी' का नारा; क्यों अहम है पीएम मोदी का अमेरिका दौरा? | @anjanaomkashyap#ATVideo #PMModi #NaMosteAmerica #JoeBiden #ModiInAmerica pic.twitter.com/aeG85ycAO3
— AajTak (@aajtak) September 24, 2021
यावर वरिष्ठ पत्रकार शितल सिंह यांनी फेसबुकवर एक पोष्ट शेअर केली आहे. त्या म्हणतात, पंतप्रधानांचा अमेरिका दौरा कव्हर करण्यासाठी पोहचलेल्या अंजना कश्यप ट्रोल होत आहेत. कोणतीही पूर्व परवानगी न घेता भारतीय दुतावासातील सचिव स्नेहा दुबे यांची लाईव्ह प्रोग्राममध्ये प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या कॅबीनमध्ये माईक घेऊन घुसल्या आणि दुबे यांनी सभ्य भाषेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यांच्याच चॅनलने या मुर्खपणाचे लाईव्ह प्रसारण केले.
#AnjanaOmKashyap and @aajtak haven't learnt, you don't go live to a person or persons who care a tuppence about her and (PM?)#AnjanaOmKashyap having a bad tour .
*Video courtesy @aajtak via @yippeekiyay_dk pic.twitter.com/Lj7SiZDvVR— Jude David (@judedavid21) September 25, 2021
आमचे जीतके पत्रकार हा दौरा कव्हर करण्यासाठी गेले होते ते सर्व जोकर सिद्ध झाले. तसेच त्या अमेरिकेतील नागरिकांना विचारत आहेत की तुम्ही मोदींना ओळखता का? आणि पुढे म्हणतात बघा बघा मोदींच्या बाबतीत किती उत्साह आहे लोकांमध्ये. सदरील व्हिडीओ क्लिप अमेरिकेतील नागरिक मोठ्या प्रमाणात शेअर करत अंजना कश्यप यांची मुर्खता सिद्ध करत आहेत. असेही सिंह म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत संघर्ष अटळ ? मुंबईत काँग्रेस ‘इतक्या’ जागा लढण्यावर ठाम !
- कोल्हापुरात महापुराचा एक थेंबही महामार्गावर येणार नाही; गडकरींचा शब्द
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
