Share

स्मिथ- वॉर्नरवर एका वर्षाची बंदी; वॉर्नर सनरायझर्सच्या कर्णधार पदावरून पायउतार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटवर तब्बल एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज (बुधवार) याबाबतचा निर्णय घेतला. या निर्णयाची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या संघाचे कर्णधारपद सोडले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने हा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापनाने ट्विटरवरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.

स्मिथची कबुली –

चेंडूशी छेडछाड करून आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम करण्याचा आमचा प्रयत्न होता, संपूर्ण संघाला याबाबत माहिती होती, असं स्मिथने मान्य केलं. ही जबाबदारी कॅमेरून बेनक्रॉफ्ट याच्यावर सोपावण्यात आली होती असंही तो म्हणाला. तीस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट पत्रकार परिषदेत आले. जे काही झालं ते टीव्ही कॅमे-यांमध्ये रेकॉर्ड झालं आहे. हा महत्वाचा सामना होता. पण चेंडूपासून कोणतीच मदत मिळत नसल्याचं पाहून सामन्यात पुनरागमन करता यावं यासाठी संघातील काही खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली स्मिथने दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं. पण थोड्यावेळातच ऑस्ट्रेलिया सरकारने स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने काढून टाका असा आदेश क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला. त्यानंतर काही वेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!