🕒 1 min read
औरंगाबाद : शासन आदेशानुसार स्मार्ट सिटी बससेवेला शहरापासून २० किलोमीटरअंतरापर्यंत धावण्यास मुभा आहे. मात्र या शासन आदेशाला न जुमानता एसटी महामंडळाने स्मार्ट सिटी बससेवा ग्रामीण भागात सुरू करण्यात खोडा घातला आहे. आपसात स्पर्धा करुन काय फायदा ? असा सवाल महामंडळाने उपस्थित केला आहे. तर, तुमचे ड्रायव्हर-कंडक्टर आम्ही वापरत असल्याने तुम्ही हे बोलत आहात त्यास तुमच्या एनओसीची गरजच नाही. असे प्रत्युत्तर स्मार्ट सिटी बस प्रशासनाने दिले आहे. ‘महाराष्ट्र देशा’ने महामंडळ आणि स्मार्ट सिटी प्रशासनास संपर्क साधला असता दोघांनीही एकमेकांवर अशाप्रकारे निशाना साधला.
स्मार्ट सिटी बस सेवेस परवानगी नाकारण्यासंदर्भात महामंडळाने याविषयी सांगितले, ग्रामीण भागात महामंडळाच्या रोजच्या ४५० वर फेऱ्या आहेत. स्मार्ट सिटी आणि महामंडळाच्या बसेस मध्ये स्पर्धा होऊन लोकांचेच नुकसान होईल. त्यामुळे वरतुनच परवानगी नाही. एसटी प्रशासनाच्या या प्रतिक्रियेवर स्मार्ट सिटी बस व्यवस्थापनाने शासन निर्देशाचा हवाला दिला आहे.
शहरापासून २० किलोमीटरपर्यंत सिटी बससेवेला मुभा आहे, त्यास तुमच्या एनओसीची गरज नाही. नव्हे तसा अधिकारच महामंडळाला नाही, लवकरच स्मार्ट सिटी बस स्वत:चे कर्मचारी नियुक्त करणार आहेत त्यानंतर आम्हाला कोणाचीही गरज नाही. ग्रामीण भागातील छोटे – छोटे थांबे आम्ही घेतो त्यामुळे स्पर्धेचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे खरमरीत उत्तर स्मार्ट सिटी प्रशासनाने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “बेन स्टोक्सला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घ्या”
- ट्रॅक्टर रॅलीवरून महाभारत सुरु असताना आता भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा
- आधी ‘ते’ करा, नाहीतर झेपत नाही म्हणून जाहीर करा; भाजप नेत्याचं ठाकरेंना थेट आव्हान
- ‘या’ दोन मोठ्या शेतकरी संघटनांनी घेतली आंदोलनातून माघार
- पक्षविरोधी भूमिकेचे आ. सावंत यांच्याकडून खंडण


