Share

रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

Published On: 

रत्नागिरी : कोव्हीड-१९ संसर्ग बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. लहान बाळा पासून वृद्धांपर्यंत सर्वांना कोरोनाची लागण होण्याची भीती सतावते आहे. रत्नागिरीतील साखरतर येथील एका ६ महिन्याचा बाळाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासह रत्नागिरीतील कोव्हीड-१९ संसर्ग बाधितांची संख्या ६ झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी एक महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. या महिलेच्या कुटुंबातील आणखी एका महिलेसह सहा महिन्याच्या बाळाला देखील आता कोरोना झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. रत्नागिरीतील १०३ पैकी ७८ रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. अजून २५ रिपोर्ट येणे बाकी आहे. तत्पूर्वी रत्नागिरीतील एका कोरोना बाधित रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आले असून खेड येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान,कोकणातील हापूस उत्पादकाला दिलासा देण्यासाठी सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे.कोकणातला हापूस उत्पादक शेतकरी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे मोठ्या संकटात सापडले होते. परंतु १ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत तब्बल पाच हजार हापूसच्या पेट्या या रत्नागिरी जिल्ह्यातून राज्याच्या अनेक ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये रवाना करण्यात आल्या असल्याने या उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. प्रति डझन जवळपास ३५० रुपये असा दर आंब्याला मिळतो आहे.आंबा विक्रीला चालना देण्यासाठी थेट शेतकरी ते ग्राहक अशी साखळी योजना तयार करण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI&t=4s

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!