Share

‘मुसलमान’ हे भारताचे ‘मूलनिवासी’ असल्याने माझा पक्ष त्यांचा पाठीशी ठाम : रामदास आठवले

Published On: 

नाशिक : पाकिस्तान हा सुद्धा भारताचाच भाग होता. आता ते शेजारी राष्ट्र झाले आहे. मुसलमान हे भारताचे मूलनिवासी आहेत. त्यामुळे माझा रिपब्लिकन पक्ष पहिल्या पासून मुस्लिमांचा पाठीराखा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तो पर्यंत मी केंद्रात मंत्री आहे.

मोदी आहेत तोपर्यंत मी आणि मी आहे तोपर्यंत मोदी आहेत अशी तुफान फटकेबाजी करीत आपल्या विशेष काव्य शैलीत ना.रामदास आठवले यांनी उपस्थितांवर आपल्या वक्तृत्वाचे गारुड केले. नाशिक च्या गोल्फ क्लब ईदगाह मैदानावर काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जाहीर अभिवादन सभेत ना रामदास आठवले बोलत होते.

यावेळी विचारमंचावर आयोजक रिपाइं चे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे ; रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे; कार्याध्यक्ष बाबुराव कदम; प्रियकीर्ती त्रिभुवन; श्रीकांत भालेराव; सूर्यकांत वाघमारे; संजय भालेराव; सुनील रोकडे; राजेंद्र गुप्ता; विनोद निकाळजे; सुमित वजाळे; ऍड. आशाताई लांडगे;गुंफाताई भदरगे; माधुरी भोळे; उत्तम कांबळे; सिद्धार्थ कासारे; साहेबराव सुरवाडे; घनश्याम चिरणकर; ऍड.अभयाताई सोनवणे; उषाताई रामळू;मानलिताई जाधव; मीना साळवी; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना रामदास आठवले यांचा धनगर समाजाच्या वतीने घोंगडी आणि घुंघराची काठी देऊन परंपरागत पद्धतीने सत्कार करण्यात आला.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा केलेला सत्याग्रह हा मानवमुक्तीचा प्रेरणादायी क्रांतिकारी लढा ठरला आहे. संघर्ष करण्याचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्विकारून आपण न्यायहक्कांसाठी संघर्ष केला पाहिजे. मंत्री पद येते आणि जाते; मंत्री पदा पेक्षा कार्यकर्ता हेच पद माझ्या साठी मोठे आहे. विरोधक कितीही टीका करीत असले तरी मी जातीवादी लोकांसोबत नाही मी नरेंद्र मोदींसोबत आहे.आणि मोदी जातीवादी नाहीत. मोदी हे संविधानाला नमन करून सरकार चालवीत आहेत. सर्व जाती धर्मियांना न्याय देणारे सरकार मोदी चालवीत आहेत असे ना रामदास आठवले म्हणाले.येत्या २३ मे रोजी नाशिक च्या शिखरेवाडी मैदान येथे रिपाइं चे राज्यव्यापी अधिवेशन घेणार असल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली.या सभेचे चांगले आयोजन केल्याबद्दल नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांचे ना रामदास आठवले यांनी कौतुक केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!