Share

सहकार क्षेत्रात पाप सुरू, त्यामुळे अनेक सहकारी संस्था बंद-धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

बीड : पूर्वी शेतकरी आणि सामान्य माणसाच्या विकासाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रात आता अनेक पाप होत आहेत. यामुळे अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. हे पाप कमी झाल्याशिवाय सहकार क्षेत्राचा उद्धार होणार नाही असे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. परळी तालुक्यातील टोकवाडी येथील शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेच्या अद्ययावत जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री मुंडे म्हणाले की, मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवायचा असेल तर पश्चिम वाहिनीचे अरबी समुद्रात जाणारे १६५ टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवायला हवे. यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटेल. याबाबत मी स्वतः राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश सोळंके यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय दौंड, माजी आमदार विजय गव्हाणे, बाबूराव मुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती होती.

एकेकाळी शेतकरी व सामान्य माणसाच्या विकासाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रात होत असलेल्या पापामुळे अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. हे पाप कमी झाल्याशिवाय सहकार क्षेत्राचा उद्धार होणार नाही. सहकारी संस्थांना पुनरुज्जीवन मिळवून देण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!