सोलापूर : महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सीआरपीएफचे जवान सुनील काळे यांना जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा परिसरात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत लढतान शहीद झालेले सोलापुरातील सुनील काळे अनंतात विलीन झाले आहेत.
मोठी बातमी : फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर
लष्करी इतमामात त्यांच्यावर पानगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मोठे बंधू नंदकिशोर काळे आणि मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.जड अंत:करणाने सुनील काळे यांना शोकाकूल अखेरचा निरोप देण्यात आला.
काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. तसेच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. मात्र ते लॉकडाऊनमुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत.सुनील काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.
सनातनी शरद पोंक्षेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत कसलाही संबंध नाही – विकास लवांडे
दरम्यान, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट त्यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे. शहीद सुनिल काळे यांच्या मुलांच्या पीजी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून करणार असल्याची माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

