🕒 1 min read
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात महानाट्य पहायला मिळाले आहे. एका बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्तास्थापनेची बोलणी सुरु होती, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणीकरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शपथविधी उरकून टाकला होता. मात्र, राजकीय धुरंदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८० तासांमध्ये सर्व चित्र पलटून टाकले. पुन्हा एकदा हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे नुकतच देवेंद्र फडणवीस यांनी ‘द इनसायडर’ला दिलेली स्फोटक मुलाखत.
हफ्त्याने भरा पण वीजबिल भराच…. ग्राहकांना अजिबात फसवलं नसल्याचा ऊर्जामंत्र्याचा दावा
जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी अनेक गोष्ठींचा खुलासा केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. आमच्यामध्ये दोन बैठका झाल्या. त्यातील एका बैठकीला मी होतो, एकाला नाही. त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून पुढे जायचं ठरलं होतं. भाजप सोबत जायचं हा निर्णय काही एकट्या अजित पवारांनी घेतला नाही. हा निर्णय हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.
अजित पवारांसोबत स्थापन केलेलं सरकार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला नसता तर टिकलं असतं. 100 टक्के टिकलं असतं. ती पूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला. आणि त्यामुळे त्यात आम्ही फारसं काही करु शकलो नाही. म्हणून मी आज जेव्हा मागे वळून पाहिल्यानंतर असं वाटतं हा निर्णय चुकला होता. असही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पशुधन वाढविण्यासाठी नाविन्यपुर्ण योजना आखून पशुधनाचे संवर्धन करा- अमित देशमुख
त्यानंतर आता अजित पवार तातडीने शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. सिल्व्हर ओक बंगल्यावर दाखल अजित पवार झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. नुकतेच अजित पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. एकून राज्यावर असणारे कोरोनाचे संकट, येणारी विधानपरिषद निवडणूक आणि देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट यामुळे पवार काका-पुतण्याच्या भेटीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाल आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
