Share

सनातनी शरद पोंक्षेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत कसलाही संबंध नाही – विकास लवांडे

Published On: 

मुंबई : कोविड काळातील राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या सामाजिक, विधायक कार्यासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्य विश्वस्त मंडळातील सदस्यांनी ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या विविध सामाजिक तसेच विधायक कार्यासंबंधी माहिती दिली. तसेच उपस्थित विविध वैद्यकीय संघटना व कलावंत प्रतिनिधींनी ट्रस्टने केलेल्या मदतीबद्दल आभार मानतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.

शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवण न झालेल्या बाबतच्या तक्रारी कृषी विभागाकडे तात्काळ द्याव्यात- देशमुख

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी याप्रकरणी राष्ट्रवादीची भूमिका फेसबुक पोस्ट मधून स्पष्ट केली आहे. सनातनी शरद पोंक्षेचा NCP सोबत कसलाही संबंध नाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सरचिटणीस या नात्याने तो व त्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी लक्ष्मण माने इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे नाट्य परिषदेला व इतर घटकांना कोरोना संकट काळी मदत केली. त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी पोंक्षे परिषदेचा सरचिटणीस नात्याने व्यासपीठावर उपस्थित होता अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

लवांडे पुढे म्हणाले,त्या नाट्य परिषदेच्या कार्यकारी मंडळात सर्व विचारधारेचे सदस्य आहेत. त्यांच्या व्यक्तिगत विचारांचा कसलाही पक्षाशी संबंध नाही. पोंक्षे बरोबर पक्षाचे व्यक्तिगत मतभेद कायम आहेत. पक्षाशी त्याचा कुणीही संबंध जोडू नये. नथुराम गोडसे समर्थकांना विरोध कायम राहील. त्या कार्यक्रमाचा सोशल मिडियाद्वारे अपप्रचार गैरसमज करू नये असं म्हटलं आहे.

फेसबुकने आणि ट्वीटरने नोकरी नाकारली…मग ‘या’ दोघांनी जे केलं ते खरोखरच अद्भुत आहे

दरम्यान आता शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोंक्षे यांच्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हे देखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल’. अस जयंत पाटील यांनी सांगितल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे. अस देखील जयंत पाटील म्हणाले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!