Share

दुकानांच शटर उघडणार ! ‘या’ वेळेच्या अटीसह अखेर कोल्हापुरात व्यापार आजपासून सुरु

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यानंतर कोरोनाची स्थिती ही उर्वरित महाराष्ट्रात आटोक्यात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती मात्र चिंताजनक होती. यामुळे इतर जिल्ह्यांतील निर्बंध हटवल्यानंतर देखील कोल्हापुरातील निर्बंध हे कायम ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात तीन मंत्री असताना देखील कोरोना आटोक्यात आणण्यात प्रश्नासनाला अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

मागील दीड महिन्यामध्ये अत्यावश्यक वगळता इतर दुकाने खुली करण्यावरून जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. कुठल्याही परिस्थितीत दुकानं उघडणार मग पोलीस किंवा लष्कर आलं तरी पर्वा नाही, अशी आक्रमक भूमिका कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी घेतली होती. यानंतर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेत स्थिती चिंताजनक नसल्याचं म्हटलं. त्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मागील आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट ९.७ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने शनिवारी जिल्हा प्रशासनाने आजपासूनसोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शासनाच्या निकषानुसार जिल्ह्याचा समावेश आता कोरोनाच्या तिसऱ्या स्तरामध्ये झाला असून, अत्यावश्यक सेवा वगळता गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले सगळे व्यवसाय, दुकाने उद्यापासून खुली होणार आहेत, मात्र काही बाबतीत निर्बंध कडक ठेवण्यात आल्याचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत शासनाच्या पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यासाठी सोमवारपासून व्यावसायिकांना काही प्रमाणात नियम शिथिल करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण काही बाबींमध्ये निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सुरू राहतील व शनिवारी-रविवारी बंद असतील.

हे सुरू रहणार –

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने रोज सकाळी ७ ते ४ यावेळेत.
  • अत्यावश्यक वगळता अन्य सर्व दुकाने व कार्यालये. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ यावेळेत.
  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, फिरणे, सायकलिंग, खेळ, सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ पर्यंत.
  • रेस्टॉरंट सर्व दिवशी फक्त पार्सल व घरपोच सेवा.
  • चित्रीकरण अलगीकरणाच्या व्यवस्थेसह सर्व दिवशी सकाळी ७ ते ४.
  • लग्नसमारंभ २५ माणसांत, अंत्यविधी २० माणसांत.
  • स्थानिक स्वराज्य तसेच सहकारी संस्थांच्या सभा सभागृहाच्या ५० टक्के.
  • व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर सर्व दिवशी सकाळी ७ ते ४ या वेळेत.

हे बंद रहाणार –

  • मॉल, सिनेमागृह,नाट्यगृह.
  • कार्यक्रम मेळावे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!