🕒 1 min read
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं होतं.
अखेर २ मे रोजी निवडणूक पार पडली असून आज मतमोजणी पार पडत आहे. गोकुळच्या निवडणुकांमध्ये चुरशीने 99.78 टक्के इतकं मतदान झालं आहे. मात्र, यावेळी सोशल डिस्टंसिंग व इतर कोरोना नियमांना हरताळ फसल्याचे दिसून आले. आता याचे परिणाम उमटू लागले असून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे.
यापार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज तडकाफडकी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून ते १५ मे पर्यंत १० दिवसांचा कडक लॉकडाऊन कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सामान्य कोल्हापूरकरांनी देखील नाराजी व्यक्त केली असून निवडणूक झाल्यानंतरच लॉकडाऊन का ? याआधी गरज असताना राजकीय फायद्यासाठी टाळाटाळ केली का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोरोना वाढलाय निवडणूक नको अशी भूमिका आम्ही घेतली असताना तेव्हा हट्ट आणि आता #गोकुळ निवडणूक झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय. तेव्हा माणसं मरत नव्हती का ? #कोल्हापूर ही गोष्ट कधीही विसरणार नाही.
— Shoumika Mahadik (@shoumikamahadik) May 4, 2021
दरम्यान, गोकुळ संचालकपदाच्या निवडणुकीतील महाडिक गटाच्या विजयी उमेदवार व भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी देखील सतेज पातळ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘कोरोना वाढलाय निवडणूक नको अशी भूमिका आम्ही घेतली असताना तेव्हा हट्ट आणि आता गोकुळ निवडणूक झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय. तेव्हा माणसं मरत नव्हती का ? कोल्हापूर ही गोष्ट कधीही विसरणार नाही.’ असा संताप शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चिंताजनक : 1 ऑगस्ट पर्यंत भारतात ‘इतक्या’ लाख लोकांच्या मृत्यूशी शक्यता, अमेरिकेतील संस्थेचा अंदाज
- कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने कामकाज करावे – आदित्य ठाकरे
- हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता
- तेलगाव येथील ट्रॉमा केअर युनिटचे काम संथगतीने
- महाराष्ट्राला ऑक्सिजनचा २०० मेट्रीक टन वाढीव पुरवठा करावा, सीताराम कुंटेंचे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

