Share

धक्कादायक; धावत्या बसचे स्टेअरिंग दिले लहान मुलाच्या हातात, अन झाले ‘असे’ काही!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गंगापूरहून उदगीरकडे जात असलेल्या एसटी महामंडळाच्या एका बसमध्ये चालकाने स्टेरिंग चक्क लहान मुलाच्या हातात दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर महामंडळाकडून चालकाला निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र या घटनेमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी गंगापूर आगारातील एसटी बस घेऊन आर. बी. शेवाळकर हे उदगीरकडे निघाले होते. बसमध्ये २५ पेक्षा अधिक प्रवासी बसलेले होते. ही बस घेऊन जात असलेल्या शेवाळकर याने धावत्या बसचं स्टेअरिंग एका लहान मुलाच्या हातात दिले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त करत एसटी चालकाच्या निलंबनाची मागणी केली.

त्यानंतर सोमवारी शेवाळकर हे उदगीरहून बस घेऊन गंगापूर येथे आले असता त्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र याबाबत शेवाळकर यांनी अजबच खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले बस मध्ये एक लहान मुलगा रडत होता. त्या लहान मुलाचे रडणे थांबवण्यासाठी त्याच्या हातात आपण स्टेरिंग दिले. दरम्यान लहान मुलाच्या हातात स्टेअरिंग सोडवण्याच्या या प्रकारामुळे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी शेवाळकर यांना निलंबित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!