Share

धक्कादायक! आरोपी शोधण्यासाठी घेतला अंधश्रद्धेचा आधार

Published On: 

उस्मानाबाद: एकविसाव्या शतकात मानवी जीवन एकीकडे डिजीटल होत आहे. नवीन यंत्रणेचा वापर वाढत आहे. पण आजुनही काही ठिकाणी अंधश्रद्धा जोपासण्याचे प्रकार सुरू आहेत. तुळजापूर तालुक्यात अणदूर येथील हिप्परगा ताड गावात आरोपी शोधण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतल्याची घटना समोर आली आहे. या गावातील आरोपी शोधण्यासाठी गावकऱ्यांनी संशयित आरोपीना हनुमानाची शपथ घेऊन पायरी बडविण्यास लावली आहे.

तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा (ताड) गावातील बसवेश्वर गुरुनाथ बचाटे या शेतकऱ्याचा दोन एकर उस दहा दिवसांपुर्वी अज्ञाताने जाळला. या आगीमुळे त्यांचे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानासंदर्भात इटकळ आऊटपोस्टला त्यांनी तक्रार केली होती. पण आरोपीचा शोध लागला नाही. या तपासाचा छडा लावण्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन एक समिती स्थापन केली.

या समितीने आरोपी शोधण्यासाठी गावातील नागरिकांना ग्रामदैवत हनुमानाची शपथ घ्यायची आणि त्यानंतर पायरी बडवायची असा निर्णय घेतला. यात जो शपथ घ्यायला तयार होणार नाही त्याचे नाव पोलीसाना कळवायचे असे समितीने ठरवले. यानंतर दीडशेच्यावर ग्रामस्थांनी ‘आम्ही ऊस पेटवला नाही’ अशी शपथ घेतली आणि मंदिराची पायरी बडवली. या प्रकारातून महिला, बालके व वृद्धाना वगळण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!