मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड या दोन संघातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यास इंग्लंडला यश आले. मात्र या सामन्यात पदार्पण करणारा इंग्लंडचा गोलंदाज ओली रॉबिन्सनला चांगली कामगिरी करुनही निलंबन करण्यात आले. कारण २०१२-१३ साली रॉबिन्सनने काही अक्षेपार्ह ट्विट केले होते.
आठ वर्षापुर्वी ओली रॉबिन्सनने सोशल मीडीयीवर लैंगिकता आणि वर्णद्वेषाबद्दल टिप्पणी केली होती. पहिल्या सामन्यादरम्यान ती समोर आली त्यामुळे ईसिबीने त्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्याला निलंबीत केले. मात्र हा वाद शमण्याआधीच आणखी एका इंग्लिंश खेळाडुचे नाव समोर आले आहे. या खेळाडुने देखील किशोरावस्थेत असताना आपत्तीजनक सोशल मीडिया टिप्पणी केल्या होत्या. मात्र या खेळाडुचे नाव अद्यापही समोर आले नाही.
या खेळाडुने जेव्हा हे ट्विट केले होते तेव्हा तो १६ वर्षाचा देखील नव्हता अशी माहिती समोर आली आहे. मात्र ओली रॉबिन्सनमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणात ईसीबीने चौकशी देखील सुरु केली आसल्याची माहिती समोर आली आहे. तर या खेळाडुवर आरोप सिद्ध झाले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे ईसीबीने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नंबर एक वर येण्याची अश्विनकडे सुवर्ण संधी ; करावी लागेल ‘अशी’ कामगिरी
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड प्रकरण, ‘या’ अटीसंह खेळाडू इंग्लंडला जाण्यास तयार
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विजयाचा आयसीसीकडुन मोठा गौरव
- टीम इंडियाला मिळणार तीन आठवड्यांची विश्रांती, कारण…
- वजन कमी तर पैसे जास्त; नव्या चित्रपटासाठी बेबोने मागितली इतकी रक्कम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

