पुणे : पुणे शहरात दुबई येथे जाऊन आलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना मुंबईहून पुण्यात घेऊन येणारा ओलाचा चालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच एक विमानातील सहप्रवाशाला देखील याची लागण झाली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुण्यातील कोरोनाचे एकूण ५ रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढत आहे.भारतात कोरोनाव्हायरसचा धोका वाढला आहे. सोमवारी देखील कर्नाटक आणि पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. कर्नाटकच्या बंगळुरूत एका आयटी इंजिनीअरला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.
होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

