Share

धक्कादायक : भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत

Published On: 

मुंबई : भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतल्या 24 प्रभागांपैकी डी ई, जी दक्षिण आणि के पश्चिम या चार प्रभागांमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वरळी इथल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबचा वापर करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा विचार आहे.

धारावी परिसरात कोविड १९च्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने या परिसराची पाहणी केली. दरम्यान मुंबई पोलिसांनी सतरा लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे 57 हजार 500 मास्क भायखळा इथून जप्त केले आहेत. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

दरम्यान, लॉकडाउन लागू होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या गुरुवारी १२९७ वर पोहचली आहे. एका दिवसात महाराष्ट्रामध्ये १६२ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्याचा मृत्यूदर वाढला असून सहा टक्क्यांवर आला आहे. तो सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. करोनाचा फैलाव नियंत्रणात नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!