बीड : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शेत नांगरणीवरून होम आयसोलेशनमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने तोंडाचे मास्क काढून त्याच्या चुलत भावाच्या तोंडावर व अंगावर थुंकल्याचा प्रकार केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडला. या प्रकरणी रुग्णासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, सारुकवाडी येथील सुभाष फुंदे व त्याची आई कुसूम फुंदे हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ते दोघे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. गावातील श्रीराम पांडुरंग फुंदे हे व त्यांचा मुलगा दीपक श्रीराम फुंदे हे दोघे बापलेक शेतात काम करत होते. यावेळी त्यांना सुभाष फुंदे शेताची नांगरणी करत असताना दिसला.
तेव्हा चुलत भाऊ दीपकने ‘तू आमच्या मालकीचे शेत नांगरु नको, तुझेच शेत नांगर’, असे म्हणाला. त्यावरून सुभाषने मास्क काढून दीपक यांच्या तोंडावर व अंगावर थुंकला. यावेळी सुभाषची आई कुसुम फुंदे, पत्नी उषा फुंदे व वडील बळीराम फुंदे यांनी श्रीराम फुंदे व दिपक फुंदे यांना काठीने मारहाण केली. या प्रकरणी श्रीराम फुंदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे, उषा फुंदे या चौघाविरुद्ध जीवघेणा साथ रोग पसरविणे, निष्काळजीपणा व साथ रोग कायद्याचे उल्लंघन करणे, मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल रद्द झाल्यानंतर बीसीसीआयच्या निर्णयाचे ‘या’ संघाकडुन स्वागत
- बंगालमध्ये राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट झालं जप्त
- पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ; आता कोल्हापुरात उद्यापासून कडक लॉकडाऊन
- मोठी बातमी! कोरोनाच्या विळख्यामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित
- ‘गोकुळ’ मध्ये पाटील गटाची घौडदौड, तर महाडिक गटाने खातं उघडलं !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

