Share

धक्कादायक! आठ महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने नगरपरिषदेच्या आवारातच कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

लातूर: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात देखील सफाई कर्मचारी कामावर हजर होते. मात्र, नगरपरिषदमधील भोंगळ कारभारामुळे तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे हे कामगार त्रस्त होते. याच आर्थिक संकटात सापडलेल्या बाबुराव नामदेव गायकवाड या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. सकाळी ही घटना कळल्यावर संतप्त कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद निलंगा येथे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

जोपर्यंत नगरपरिषद मुख्याधिकारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह झाडावरुन खाली काढू देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी हजर होते. वाढता असंतोष लक्षात घेऊन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी येत कर्मचाऱ्यांचे मत ऐकून घेतले. त्यानंतर मृतदेह झाडावरुन खाली काढण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी निलंगा येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

बाबुराव नामदेव गायकवाड हे गेल्या ३५ वर्षांपासून नगरपरिषद निलंगा येथे मस्टर वरील सफाई कामगार या पदावर काम करत आहे. काही वर्षांनंतर त्यांना कंत्राटी स्वरुपात कार्यरत करण्यात आले. आज ना उद्या आपन कायमस्वरूपी कर्मचारी होऊ या आशेवर ते काम करत होते. मात्र, एजन्सीला काम देण्यात आले, त्यांनी पगार रोखला. तोही आठ महिन्यापासून याची तक्रार नगरपरिषद प्रशासनास करत होते मात्र नगरपरिषद एजन्सीकडे बोट करत होते. शेवटी कंटाळून आत्महत्या करणे पसंत केले आणि स्वतःचे जीवन संपवले. दत्ता गायकवाड यानी निलंगा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. मुख्याधिकारी, कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!