Share

खडकवासल्यातून तब्बल ‘इतके’ टीएमसी पाणी मुठा पात्रात

Published On: 

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुण्यासह राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यानंतर मुठा नदीपात्रात कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. खडकवासल्यापाठोपाठ काही दिवसांतच पानशेत धरण भरले, यानंतर विसर्गात वाढ करण्यात अली होती.

तर, काही दिवसांपूर्वी खडकवासला धरण साखळीतील वरसगाव देखील पूर्ण क्षमतेने भरले असून टेमघर देखील भरण्याच्या मार्गावर आहे. या मोसमात एकूण ८.३५ टीएमसी इतका पाणीसाठा मुठा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सद्या पानशेत मधून ३ हजार ९०८, वरसगाव मधून २ हजार ६०० क्युसेक वेगाने पाणी खडकवासला धरणात पाणी सोडले जात असून खडकवासल्यातून ९ हजार ४१६ क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांचा कोरोना अहवाल अखेर निगेटिव्ह!

आज सकाळी ६ वाजेपर्यंत खडकवासला धरण प्रकल्पामध्ये, खडकवासला : १.९७ टीएमसी/१००%,  पानशेत : १०.६५ टीएमसी/१००% , वरसगाव : १२.८२ टीएमसी/१००%, टेमघर : ३.३१ टीएमसी/८९.३४% भरले आहे. तर, एकूण पाणीसाठा : २८.७५ टीएमसी म्हणजेच ९८.६४% इतक्या पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे.

सरकारच्या पदवी परीक्षेच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!