Share

स्व.अनिल राठोड यांच्या कुटुंबामागे शिवसेना खंबीरपणे उभी-दादा भुसे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे मागील महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनिल राठोड हे अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातून सलग २५ वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्व.अनिल राठोड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले, शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने शिवसेना पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या मागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या जाण्याने अहमदनगर मधील शिवसेना पोरकी झाली आहे. त्यांचे कुटुंबीय व त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्यामागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे, असे भुसे म्हणाले.

शरद जोशींमुळ शेतकऱ्यांना लढण्याची हिम्मत मिळाली, कोण म्हणतय असं… जरूर वाचा

अहमदनगर शहरातील अनेक शिवसैनिकांनी मंत्री दादा भुसे यांच्यापुढे स्वर्गीय राठोड यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, विशाल वालकर, यांच्यासह अनेक नगरसेवक, शहरातील शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

देशाच्या विकासात सहकार चळवळ महत्वपूर्ण – विश्वजित कदम

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!