Share

धोका टळला : शिवसेनेच्या ‘त्या’ मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख स्वत: हून होम क्वारंटाइन झाले आहेत. शंकरराव गडाख यांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची तातडीनं कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. ट्विट करत शंकराव गडाख यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना अहवाल येईपर्यंत सगळं सोनई गावच चिंतेत होतं. मात्र सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

शंकरराव गडाख यांचं गाव असलेले नेवासे तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सोनईसह परिसर सील करण्यात आला होता. स्वत: शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गावात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाने 11 पथके कार्यरत केले असून परसरात तपासणी करण्यात येत आहे.

सोनई गावात एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण गाव 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गावकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनांचा आढावा घेतला होता. शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनिता गडाख या माजी पंचायत समिती सभापती आहेत सामाजिक कार्यात अग्रस्थानी असतात त्यामुळे सौ.गडाख या लवकर व्हाव्यात यासाठी परिसरातून प्रार्थना करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिस्त पाळण्यासाठी मनपाच्या मदतीने व्यापारी बनविणार ‘टास्क फोर्स’

‘मंत्र्यांसाठीची वाहन खरेदीची फाईल क्लिअर होतेय मात्र, कोरोना योद्ध्यांच्या वेतनाची फाईल अडकून राहतेय’

५०० कोटींचा दावा करणाऱ्यांनी एकदा डॉक्टरकडे जाऊन स्वत:ला तपासून घ्यावे – फडणवीस

यंदा आयपीएलची परदेशवारी निश्चीत ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!