मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. यानंतर या आमदारांनी भाजप सोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्या सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरु असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदाराने थेट शिवसेनेला धमकी दिली होती. यानंतर आज शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी याचा चांगलाच समाचार घेतला होता.
वरुण सरदेसाई नेमकं काय म्हणाले?
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चालू काय हे कळत नाही, एक आमदार धमकी देतो, दुसरा बंदूक काढतो, तिसरा धमक्या देतो, असं म्हणत शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. कोकणातील जनता शिवसेनेशी बांधिल आहे. आदित्य ठाकरेंना उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय. मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असंही ते म्हणाले आहेत.
संजय गायकवाडांनी काय धमकी दिली होती?
गेल्या काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा जोरदार राडा झाला. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनाला धमकीच दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल, तर चून चून के, गिन गन के मारेंगे, असं म्हणत त्यांनी शिवसेनाला इशारा दिला होता.
सदा सरवणकर प्रकरण काय ?
गेल्या आठवड्यात रात्री मुंबईच्या प्रभादेवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेना पक्षाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. याच पाश्वभूमीवर सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Viral video | चक्क मांजराचा विमान प्रवास! व्हिडिओ पाहून व्हाल थक्क…
- Sandipan Bhumre | “खैरेंचं डोकं गौमुत्राने साफ करावे लागणार” ; संदिपान भूमरेंची टोलेबाजी
- Shivsena । “वेदांता-फॉक्सकॉन गुजरातला जाण्यामागे केंद्राचा हात असून शिंदे -फडणवीस सरकार याला जबाबदार!”
- Weight Loss Hack | वजन कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी दुधात मिसळून प्या, काही दिवसातच दिसून येईल परिणाम
- Sandipan Bhumre | “शिंदेंचे मोठे स्वागत नागरिकांनी केले त्यामुळे…” ; दानवेंच्या आरोपावर संदिपान भूमरेंचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

