औरंगाबाद : पैठणच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिडकीनवरुन निघाल्यानंतर तिथे गौमुत्र शिंपडण्यात आले होते. यावर संदिपान भूमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला आहे. गौमुत्र शिंपडण्याचे काम, हे सांगायचं काम चंद्रकांत खैरेंचे असल्याचे भूमरे म्हणाले.
संदिपान भूमरे म्हणाले, “गौमुत्राने रोड साफ करण्यापेक्षा खैरेंचं डोकं गौमुत्राने साफ करावे लागणार आहे. आता त्यांना त्याची गरज आहे. कारण त्याचे डोकं आता काम करत नाही. त्यामुळे त्यांचे डोके गौमुत्राने धुवावे लागणार आहे आणि ते आम्ही धूवू, त्याच्याशिवाय ते साफ होणार आणि खरैंचं डोकं काम करणार नाही.”
अंबादास दानवेंच्या आरोपावर भूमरेंचे स्पष्टीकरण-
शिंदे गटातील आमदार संदिपान भूमरे यांच्यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आरोप केले होते. भूमरे यांच्या मतदार संघातील महत्त्वाकांक्षी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट त्यांच्या जावयाला मिळाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. यासाठी भूमरे यांच्या जावयाने रजिस्ट्री करून घेतली, असे देखील दानवे म्हणाले होते. यावर एका वृत्तवाहीणीशी बोलताना भुमरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
संदिपान भूमरे म्हणाले, “अंबादास दानवे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. याबाबत अजून टेंडर देखील निघाले नाही. जावई असले म्हणून काय झालं. त्यांचे ते जुने रजिस्ट्रेशन आहे. जावई होण्याच्या आधीपासून ते कॉन्ट्रक्टरशीप करतात. त्यामुळे यात काही माझा सबंध नाही. टेंडर हे ऑनलाईन असते, त्यामुळे मी टेंडर द्यायचा प्रश्न नाही, माझ्या हातात तसे कोणतेही अधिकार नाहीत. अंबादास दानवेंचा आरोप साफ खोटा आहे. एकनाथ शिंदेंचे मोठे स्वागत नागरिकांनी पैठणला केले त्यामुळे भुमरेशिवाय त्यांना कोणी दिसत नाही. ब्रह्मगव्हाणचं काम निधीअभावी दोन वर्षांपासून बंद आहे. निधीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे लागलो होतो की शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा. आता निधी मंजूर झालाय. टेंडर कुणीही भरू शकतं. ते ऑनलाइन टेंडर आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Weight Loss Hack | वजन कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी दुधात मिसळून प्या, काही दिवसातच दिसून येईल परिणाम
- Sandipan Bhumre | “शिंदेंचे मोठे स्वागत नागरिकांनी केले त्यामुळे…” ; दानवेंच्या आरोपावर संदिपान भूमरेंचे स्पष्टीकरण
- Keeway Bikes | Keeway ने लाँच केल्या दोन नवीन बाईक, जाणून घ्या किमती…
- Aditya Thackeray । स्वत:साठी खोके महाराष्ट्रासाठी धोके हेच या सरकारचे सत्य; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरूर मतदार संघातील विकासकामांचा आढावा


