🕒 1 min read
मुंबई : एकीकडे संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे. तर दुसरीकडे कोरोना लढ्यासाठी झटणारे पोलिस, आरोग्यविभागातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. मात्र पोलिसांवर तसेच होणारे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
याचप्रमाणे मुंबईतील कुर्ला पाईपलाईन येथे काही लोकांनी पोलिसांवर हात उगारल्याचा तसंच त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. फेसबुक पोस्ट करत नांदगावकर यांनी भाष्य केलं आहे.
या पोस्ट मध्ये नांदगावकर म्हणतात, ‘जे पोलिसांच्या वर्दीला हात लावतील त्यांना दिसता क्षणी चोप द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असं नांदगावकर या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.
https://www.facebook.com/nitinnandgoankar/posts/2735276619917755
तसेच ‘ज्या मुस्लिम समाजातील समाजकंटकांना कायदा सुव्यवस्थेचं पालन करायचं नसेल ते पाकिस्तानात जाऊन का राहत नाहीत?” असा सवाल करत त्यांची महाराष्ट्राला गरज नसल्याचंही म्हटलं. ‘एकीकडे जनतेची सेवा करताना करोनाची लागण होऊन काही पोलीस बांधव शहीद झाले. काही विकृत प्रवृत्तींमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या समाजकंटकांना वेळीच आवरलं पाहिजे. अन्यथा हे समाजकंटक करोनापेक्षाही घातक ठरतील,’ अशी चिंता नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

