Share

शिवसेनेकडून रामदास कदम यांना पर्याय शोधण्याचे काम सुरू

Published On: 

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना माहिती पुरवल्यामुळं वादग्रस्त ठरलेले शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळालेल्या कदम यांना पुन्हा आमदारकीची संधी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. रामदास कदम यांच्या जागी आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरु झाला आहे.

रामदास कदम यांची विधान परिषदेचे मुदत २०२२ ला संपत आहे. त्यांचे सदस्यत्व कायम ठेवले जाणार नसल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. पक्षाला उपयोगी पडणारा, नियम न तोडणारा, आणि तळागाळातील लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे. विधान परिषदेत रामदास कदम यांच्याजागी विभागप्रमुख किंवा युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

रामदास कदम यांची कारकीर्द
२००५ मध्ये रामदास कदम यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली. सलग चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या रामदास कदमांचा २००९ मध्ये मात्र पराभव झाला होता. तेव्हा रामदास कदमांचे काय होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवत मोठी संधी दिली. २०१० मध्ये रामदास कदम विधानपरिषदेवर निवडून गेले. २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. २०१६ मध्ये पुन्हा त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली. २०१९ मध्ये त्यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेचा कोकणातील चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. कोकणात राणेंना टक्कर देणारा नेता म्हणून रामदास कदम हे नाव घेतलं जातं. शिवसेनेतील पहिल्या फळीतील एक आक्रमक आणि वजनदार नेते म्हणून रामदास कदम यांची आजही महाराष्ट्रात ओळख आहे.

यामुळे उद्धव ठाकरे कमालीचे नाराज
मंत्रिपदावरून बाजूला केल्यापासून कदम नाराज असल्याचे बोलले जात होते. त्याच नाराजीतून त्यांनी अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी तसा जाहीर आरोप केला होता. त्यानंतर रामदास कदम व आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे कदम यांच्यावरील संशय बळावला होता. या संपूर्ण घटनाक्रमामुळे उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहेत. त्यांची नाराजी आणि शिवसैनिकांचा रोष टाळण्यासाठी रामदास कदम हे यंदाच्या दसरा मेळाव्यालाही गेले नाहीत. आता आमदारकी नाकारून त्यांच्यासह पक्षातील अनेकांना योग्य तो संदेश देण्याचं पक्ष नेतृत्वानं ठरवल्याचं बोलले जाते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!