सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुलातील सिथेटींक ट्रकसाठी 5 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले असून 400 मीटरचा हा ट्रक तयार करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून अत्याधुनिक बहुउद्देशीय व्यायामशाळा (जिम) उभारण्यासाठी 30 लाख रुपये निधी मंजूर करण्यात येतील. तसेच क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावली जातील. यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव तयार करावेत असे आदेश क्रीडा विभागाला पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले
कोरोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी 10 ॲम्बुलन्स खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून 5 ॲम्बुलन्स जिल्ह्यासाठी मिळणार आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून यासाठी 72 लाख 44 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायत यांना 8 शववाहिका ही खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोरोना आजार संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठकीत ते बोलत होते.
पहा काय म्हणाले उदय सामंत :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/705552203374911/
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

