Share

क्रिकेट वादात मध्यस्थी केल्याने शिवसेनेच्या उपमहापौरावर गोळीबार

Published On: 

जळगाव : शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी क्रिकेट वादात मध्यस्थी केल्यामुळे त्यांच्यावर रविवार २५ जुलैरोजी रात्री गोळीबार करण्यात आला. या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून पोलीस यंत्रणेकडून तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील खोटे नगर परिसराजवळ असलेल्या मैदानावर नितीन राजपूत आणि महेंद्र राजपूत या दोघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद निर्माण झाला. हा वाद मिटविण्यासाठी उपमहापौर कुलभूषण यांनी या वादात मध्यस्थी केली. या वादात त्यांना शिवीगाळ करण्यात आली. या वादानंतर रात्री चारचौकी वाहनातून हल्लेखोरांनी त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर गोळीबार केला.

या घटनेत मंगल सिंह राजपूत, महेंद्र राजपूत, बिऱ्हाडे, उमेश राजपूत यांचा समावेश असल्याचे कुलभूषण यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेत ते सुदैवाने वाचले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेविरुद्ध कुलभूषण यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी वाळू व्यावसायिकांच्या वादातही कुलभूषण यांचे नाव आले होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला या घटनेशी संबंधित असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास केला जात असून या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!