🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ हा विलगीकरणात असुन न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुचा दुसरा संघ हा पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
बीसीसीआयने श्रीलंका दौर्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यात काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे आहेत. या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे.
शिखर धवनने कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी एक ट्विट केलं आहे. देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो. तुमच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार, असं ट्विट करत त्याने बीसीसीआय आणि सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
Humbled by the opportunity to lead my country ???????? Thank you for all your wishes ???? pic.twitter.com/SbywALBTwZ
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 11, 2021
मर्यादित षटकांची ही मालिका १३ जुलैपासुन सुरु होउन २५ जुलै पर्यंत चालणार आहे. यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जुलै, दुसरा १६ आणि तिसरा सामना १८ जुलै रोजी होणार आहे. तर टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जुलै, दुसरा २३ जुलै आणि अंतिम सामना २५ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने केले चॉकलेटचे वाटप!
- ‘एकदा या स्मार्ट शहराची यातना बघा ओ’, औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या पोस्टवर नागरिकांच्या भन्नाट प्रतिक्रिया!
- ‘प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय’, काँग्रेस पदाधिकाऱ्याचा हल्लाबोल
- ‘चंद्रकांत पाटील किंवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणे मी रास्त समजत नाही’
- येणाऱ्या काळात खाम नदीकाठ पिकनिक स्पॉट म्हणून नावारूपास येईल- पालकमंत्री देसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
