Share

कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला; टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीमही चेन्नईमध्ये दाखल

Published On: 

चेन्नई :  कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड  यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. इंग्लंड विरुद्धातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर मंगळवारी चेन्नईत दाखल झाले आहेत. हे तिघेही बायो बबलमध्ये राहणार आहेत. टीम इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत. इंग्लंड टीमही चेन्नईमध्ये दाखल झाली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर हे खेळाडू हॉटेलच्या दिशेने रवाना झाले. याआधी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे चेन्नईत दाखल झाले. हे दोघेही सध्या क्वारंटाईन आहेत.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!