टीम महाराष्ट्र देशा – ऑस्ट्रेलिया संघाचा यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग याला आयपीएल मधील प्रशिक्षक पद सोडावे लागणार असल्याच दिसत आहे.कारण बीसीसीआयचा परस्पर हितसंबंध जपण्याला विरोध असलेल्याने रिकी पॉन्टिंग याला प्रशिक्षक पदावरून दूर करण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शेन वॉर्नच्या एका वक्तव्यामुळे रिकी पॉन्टिंगचे प्रशिक्षक पद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
रिकी पॉन्टिंग हा सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक देखील आहे. त्यामुळे बीसीसीआयचा परस्पर हितसंबंध जपण्याला विरोध असल्याने रिकी पॉन्टिंग बाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
नक्की काय म्हणाले शेन वॉर्न?
“पॉन्टिंग हा सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. त्यामुळे पॉन्टिंग हा दिल्लीच्या संघाचा प्रशिक्षक होऊ शकत नाही. हे परस्पर हितसंबंध जपण्यासारखे आहे.”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

