Share

‘शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे’ : शिवेंद्रराजे भोसले

Published On: 

सातारा : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पडल्याची चर्चा सुरू झाली. दोन्ही राजेंच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला बळकट करण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर आली होती.

साताऱ्यातील दोन दिग्गज नेते आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची कधीकाळी घट्ट मैत्री होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि शशिकांत शिंदे यांच्यासोबत त्यांचा संघर्ष सुरू झाला. मात्रा आता पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

जावळी तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात शशिकांत शिंदेंना उद्देशून माझी वाट लावू पाहणाऱ्यांना संपवून टाकण्याची भाषा करणाऱ्या शिवेंद्रराजेंनी आज मात्र मेढा येथील सरपंच-उपसरपंच सत्कार सोहळ्यात यूटर्न मारल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे हे बाकीच्यांना माहीत नाही, असं म्हणत राजकीय खळबळ उडवून दिली.

‘निवडणूक जिंकल्यानंतर कोण कुठं गेलं हे आम्हा दोघांनाही माहीत आहे,’ असंही शिवेंद्रराजे सरपंच-उपसरपंच सोहळ्यात म्हणाले. शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदे आणि आपण एकच असल्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!