🕒 1 min read
नवी दिल्ली- तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काळजीवाहू सरकारची घोषणा केली आहे. सर्व पूर्णपणे पुरुषांच्या असलेल्या या सरकारच्या प्रमुखपदी मुल्ला हसन अखुंद हे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून असतील. तालिबानचे प्रमुख हिबातुल्ला अखुंदझदा हे सरकारमध्ये सर्वोच्च पदावर असतील.
या सरकारच्या सर्व नेमणुका या काळजीवाहू पदांवर करण्यात आल्या आहेत आणि विविध इतर खात्यांच्या प्रमुखांची घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती काल काबुल इथं तालिबानच्या प्रवक्त्याने दिली. तालिबानचे नेते अब्दुल घनी बरादर हे या अंतर्गत सरकारमध्ये उपपंतप्रधानपदी असतील.
या घडामोडी एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी एक लक्ष्यवेध प्रतिक्रिया दिली आहे. “अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतलेल्या तालिबानने खरे शरिया (इस्लामिक कायदा) पाळले पाहिजे, जे महिलांसह सर्वांच्या हक्कांची हमी देते”, असे मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.
“तालिबान हे वास्तव म्हणून समोर आले आहे. सत्तेत पहिल्यांदा त्याची प्रतिमा मानवाधिकारविरोधी होती. जर त्याला अफगाणिस्तानवर राज्य करायचे असेल तर त्याला कुराणात सांगितल्याप्रमाणे खऱ्या शरिया कायद्याचे पालन करावे लागेल जो महिला, मुले आणि वृद्धांच्या हक्कांची हमी देतो”, असं मुफ्ती म्हणाल्या.
“जर तालिबानने मदिनामध्ये पैगंबर मुहम्मद यांनी केलेल्या प्रशासनाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर ते जगासाठी एक उदाहरण ठरेल”, असे जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मुफ्ती म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, जर तालिबानला आंतरराष्ट्रीय समुदायासोबत व्यवसाय करायचा असेल तर इस्लाम आणि शरियाचे कट्टर अर्थ लावणे टाळावे.जर तसे झाले नाही तर ते अफगाणिस्तानच्या लोकांसाठी किचकट होऊन बसेल.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्र्यांची माहिती
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- ‘नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
