मुंबई : शेअर बाजारात सेन्सेक्सची मोठी घसरण झाली आहे. करोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील चिंता वाढत आहे.
कोरोनाचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर झाला असून मुंबई शेअर बाजारात तब्बल 1600 अंकांची घसरण झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच ही मोठी घसरण झाल्याने निर्देशांक 34000 अंकावर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातही 500 अंकांची घसरण होऊन तो 10 हजारांच्या खाली पोहोचला आहे.
तसेच मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.
दरम्यान, बुधवारी मुंबई शेअर बाजार बंद झाला तेव्हा निर्देशांक, 35,697 एवढा होता. आज सकाळी बाजार खुला झाला, तेव्हा जवळपास 1600 अंकांची घसरण पाहायला मिळाली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
