Share

‘नक्षलवाद्यांना शरद पवारांचा पाठिंबा, एसटी कर्मचाऱ्यांना मात्र निलंबनाचे पत्र’

Published On: 

पुणे : पुणे जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.

सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, भारताविरुद्ध युद्ध पुकारनाऱ्या नक्षलवाद्यांना पवार साहेबांच्या पाठींबा. परंतु जे एसटी कामगार संविधानाच्या आराखड्यात राहून आपल्या हक्काची लढाई लढत आहे त्यांना मात्र निलंबनाचे पत्र. हा आहे महाराष्ट्राचा नवीन कायदा. अशा शब्दात सदाभाऊंनी शरद पवारांसह महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले होते, सामाजिक परिवर्तन, सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या आदिवासी बांधवांनी देशाच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. अन्यायाच्या विरोधात जे लढतात, त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. तसेच कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत, असेही ते म्हणाले.

आदिवासी समाजातील इतर घटकात अंतर ठेवण्याचे कुठलेही कारण नाही. अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले. त्यामुळेच ते रयतेचे राज्य म्हटले जाते. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे योगदान दिले, त्याचे स्मरण आणि जतन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत वर्तमान आणि पुढील पिढय़ांसाठी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याचेही यावेळी पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!