Share

सिल्व्हर ओक पाठोपाठ बारामती येथील ‘गोविंद बागेत’ कोरोनाचा शिरकाव

Published On: 

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक पाठोपाठ बारामती येथील ‘गोविंद बाग’ या निवासस्थानी देखील कोरोनाचा प्रवेश झाला आहे. गोविंद बागेतील चार शेती कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली. गोविंद बाग येथील शेती काम करणारे ३ पुरूष आणि एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

शुक्रवारी (दि. २१) शहर आणि तालुक्यातील एकूण ८ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या ४७० वर गेली आहे. त्यापैकी २४८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तर १९७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रूई येथील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या बळीची संख्या २५ वर गेली आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर यांनी रुसा अंतर्गत उपाययोजना बाबत प्रस्ताव तयार करावा’

गणेशोत्सवाला शनिवारी (दि. २२) सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी गणेश प्रतिष्ठापनाकरण्यासाठी मंडप उभारू नये, गणेश मुर्तीची स्थापना, मंदिर किंवा पक्क्या बांधकाम असलेल्या ठिकाणी करावी. गणेश मुर्तीची उंची ४ फुटांपेक्षा अधिकअसू नये. प्रतिष्ठापना तसेच विर्सजनाच्या वेळी मिरवणूक काढू नये,प्रतिष्ठापना करताना ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.

रिक्षाच्या चाकातील हवा गेली तर भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबईला, बारामतीला की संगमनेरला ?

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!