🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान पदासाठी तीन प्रमुख नावाची शक्यता वर्तवली होती, लोकसभा निवडणुकीत भाजप युतीला बहुमत न मिळाल्यास आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि बसपा अध्यक्ष मायावती या पंतप्रधान पदाच्या दावेदार सू शकतात, असे विधान पवार यांनी केले होते,
आज मुंबईमध्ये मतदान केल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या विधानावर यू-टर्न घेतला आहे. राहुल गांधीशिवाय इतर कोण असा पर्याय प्रश्न मला विचारला गेला, त्यावर मायावती, ममता, चंद्राबाबू नायडू यांची नाव आघाडीवर आहेत असं मी बोललो. पण विधानाचा विपर्यास करून अशी बातमी छापणं म्हणजे खोडसाळपणा असल्याचं पवार म्हणाले.
दरम्यान, लोकसभेसाठी मतदान केल्यानंतर पवार यांनी सत्ता परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. देशामध्ये स्थिर सरकार येणे आवश्यक आहे, त्यामुळे जागरूक प्रतिनिधी संसदेत पाठवणे गरजेचं आहे. नागरिक देशाच्या हिताचा विचार करून मतदान करतील, असेही पवार म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
