Share

Eknath Khadse | “माझ्यासोबत राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता शहांना भेटणार”; एकनाथ खडसेंचं मोठं विधान

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजप पक्षात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एकनाथ खडसे अमित शहांची भेट घेणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. मात्र त्यांच्या या विधानाचे अनेक तर्क लावले जात आहेत. अमित शाह (Amit Shaha) यांच्या भेटीच्या चर्चांवर खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अमित शाह यांना फक्त मी नाही तर शरद पवारही  भेटणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मी अमित शहा यांच्या भेटीबाबत शरद पवारांना पूर्ण कल्पना दिली आहे. शरद पवारही माझ्यासोबत भेटीला अमित शाह यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती खडसेंनी दिली आहे.

एकनाथ खडसे पुन्हा भाजप पक्षात जाणार का? यासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या असतानाच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केला. नाशिक येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या कानात एकनाथ खडसेंनी म्हटलेल्या गोष्टीचा महाजनांनी खुलासा केला. नाशिक येथील कार्यक्रमात एकनाथ खडसे मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येऊन भेटले. यावेळी फडणवीसांच्या कानात भेटुन मिटून टाकू, असं खडसे म्हणाले असल्याचा गौप्यस्फोट महाजानांनी केला. गिरीश महाजन यांना कुठल्याही मिटवण्याच्या विषयावर मी बोललो नाही, असं स्पष्टीकरण खडसे यांनी दिलं आहे.

पक्ष सोडण्याचा चर्चांवर एकनाथ खडसेंनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. “जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. नाथाभाऊ हा पक्ष सोडणारा माणूस नाही. मी खोक्यावर विकणारा माणूस नाही”, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. ज्या पक्षाने मला राजकीय प्रतिष्ठा परत मिळून दिली त्या पक्षाला त्याग करून जाईल, असं आता तरी कुठलं वातावरण नाही. असं म्हणत खडसेंनी भाजपमध्ये पुन्हा जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

नाशिकच्या सभेनंतर एकनाथ खडसेंनी भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली असल्याचं देखील सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले. भेटीचे कारण राजकीय नाही. अन्य विषयांवर चर्चा मी त्यांच्याशी करणार आहे, असंही खडसेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

Bank Recruitment 2022 | ऑक्टोबर मध्ये होणार ‘या’ बँकांमध्ये होणार भरती

Girish Mahajan | अमित शहांनी ३ तास एकनाथ खडसेंना ऑफिसबाहेर थांबवलं अन् भेटही नाकारली – गिरीश महाजनांनी केला खुलासा

Nilam Gorhe | नार्वेकरांच्या ‘त्या’ चर्चांबद्दल निलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

Ajit Pawar | “आम्ही सत्तेत येऊन बसेल अन् तुम्हाला…”, अजित पवारांचा इशारा

Rahul Gandhi । राहुल गांधींचा पवार पॅटर्न, कर्नाटकात भर पावसात सभा गाजवली, भारत जोडो यात्रेतील Video

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!