नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह स्थानिक प्रशासनाने बैठक घेऊन, नाशिकमधील सद्यस्थितीवर मंथन केलं. यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
“महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर इथे रुग्ण संख्या जास्त आहे. एक महिन्यापूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीमध्ये फरक आहे. मुख्यमंत्री केवळ या एका कामासाठी पूर्णपणे लक्ष घालून आहेत. मुख्यमंत्री त्यांचे काम करत आहेत. मुंबईतील परिस्थिती तुम्ही पाहिली आहे. लवकरच ते नाशिक दौरा करतील” अस शरद पवार म्हणाले आहेत.
मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे – मुख्यमंत्री
तर, आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती बघून त्याची माहिती देणार आहोत. बेडची संख्या वाढली पाहिजे आणि टेस्टिंगदेखील वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विद्यापीठ नाशिकला आहे. इथे डॉक्टर्सची कमतरता असण्याचं कारण नाही. जिल्हा यंत्रणेला डिझास्टर कायद्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये, असं शरद पवार म्हणाले.
महागडी आणि उपयुक्त 50 इंजेक्शन गरीब रुग्णांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य संकटासोबतच आर्थिक संकटही आहे. नाशिक-नागपूरही औद्योगिक केंद्रे, यूपी बिहारमध्ये गेलेले कामगार परत येण्यास उत्सुक, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करु, असं शरद पवारांनी सांगितलं.
कोकणातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करा;आढावा बैठकीत अशोक चव्हाण यांचे निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

