मुंबई : जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या आयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. या अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. यासाठी जवळपास ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं राम जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे.
सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी राम जन्मभूमीवर उपस्थित होणार आहेत. इथे ते नागरिकांनाही संबोधित करणार आहेत. अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी साकेत विद्यापीठातून रामजन्मभूमीकडे रवाना होतील. यावेळी पंतप्रधान मोदी हनुमानगढीलाही भेट देतील. भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या आढावा दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी, ‘आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल,’ अशी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारला टोला लगावला होता. यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली आहे.
यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानावरही भाष्य केले. ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी आपल्याला डॉक्टर्सचीच गरज आहे, असं म्हणत पवारांच्या सुरात सूर त्यांनी मिसळला.
दरम्यान, आता शरद पवारांनी पुन्हा एकदा भूमिपूजन सोहळ्यावर भाष्य केले आहे. राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही, परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असं सांगत त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे.लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
अरे देवा…. नागपूरकरांवर लटकतेय ‘इतक्या’ दिवसांच्या लॉकडाऊनची टांगती तलवार ?
…तर शिवसेनेसोबत येण्यास भाजपा तयार: चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

