Share

शरद पवारांचा सोलापूर दौरा अन् मोहिते पाटलांच्या समर्थकांचा जीव टांगणीला !

Published On: 

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कालपासून 10 दिवसांच्या कडक लोकडाऊनला सुरुवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन पवारांनी दौऱ्याचे नियोजन केले. आरोग्यमंत्री राजेश टोपेही शरद पवार यांच्यासोबत आहेत.

मात्र आता या कोरोना आढावा दौऱ्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी माळशिरस तालुक्यासोबतच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा नव्या जोमाने बसवायचे मनोमन ठरवले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सोलापूर जिल्ह्याची घडी बसवताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा अभेद्य बालेकिल्ला असणारा माळशिरस तालुका देखील आपल्या हातात घेता यावा यासाठी मोहिते-पाटील विरोधकांना सर्व ती ताकद द्यायची हे स्पष्ट दिसून येत आहे. तालुक्यातील पवार कुटुंबाशी एकनिष्ठा असणारे सामान्य कार्यकर्ता म्हणजे रमेश पाटील. त्यांच्या वडिलांचे निधन झाले म्हणून त्यांचे सांत्वन करण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार आज त्यांच्या वाड्यावर आले. त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

कण्हेर येथील भेटीनंतर सोलापूरला जात असताना वाटेत सदाशिवनगर येथे सहकार महर्षी मोहिते-पाटील यांचे ज्येष्ठ सहकारी कै. ज्ञानेश्वर सालगुडे पाटील यांच्या बंगल्याला ही भेट दिली. त्यावेळी त्यांचे चिरंजीव भानुदास सालगुडे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व सदाशिवनगर येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखाना चार वर्षे झाले बंद आहे, तो सुरु करावा अशी विनंती केली. त्यानंतर माळशिरस येथे डॉ. रामदास देशमुख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शंकर देशमुख या बंधूंच्या शिवतीर्थ बंगल्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. चहापानानंतर कौटुंबिक चर्चा होऊन सदाशिवनगरच्या कारखान्याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक लावू व श्री शंकर साखर कारखाना कसा चालू होईल, असा प्रयत्न करण्याचे कबूल केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले की, या भागातील हजारो शेतकऱ्यांचा गाळपाअभावी उभा ऊस राहू शकतो. हा कारखाना सुरू होणे गर रजेचे आहे, साहेब आपण प्रयत्न करावा, अशी विनंती केली. पवार यांनीही राजकीय प्रतिष्ठा बाजूला ठेवून हा कारखाना सुरू होण्याबाबत मी वैयक्तिक लक्ष घालेल असे सांगितले.

माझे आरोप खोटे ठरल्यास पद्मश्री परत करेन;कंगणाचे विरोधकांना थेट आव्हान

पवार सोलापूरला निघाले खरे मात्र पुन्हा वेळापुरात उत्तम जानकर यांच्या निवासस्थानाकडे अचानक गाडी वळवली. जानकर यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करीत विधानसभा निवडणूक लढवली होती. येथे चक्क जानकर यांनी शरद पवार यांचेवर तयार केलेल्या पोवाड्याचे प्रदर्शन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते केले. पवार साहेबांना हा पोवाडा दाखवायला सुरुवात करताच खुद्द पवारांनीच तो बंद करायला लावला.

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी सुरु केलेल्या धान्यबँकेतून पवारांच्या हस्ते काही महिलांना धान्याचे वाटप करण्यात आल्यावर मग पवारांचा ताफा सोलापूरकडे रवाना झाला. मात्र, पवार माळशिरस तालुक्यात असेपर्यंत मोहिते समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. नेहमी शिवरत्नावर बैठक घेणारे पवार आज चक्क मोहिते विरोधकांच्या शिवतीर्थ आणि गरुड बंगल्यावर थांबल्याने मोहिते समर्थकांत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.

आता युवासेनेच्या युजीसीविरुद्धच्या याचिकेला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या युवक आघाडींचे समर्थन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!