Share

Sharad Pawar | दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी शिवतिर्थावर जाणार?, शरद पवार म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दादरमधील शिवाजीपार्कवर आहे. शिंदे यांचा शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट (Thackeray Group) दसरा मेळाव्याची (Dasara Melava) तयारी करत आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडल्यासारखे आरोप, टोलेबाजी करत आहेत. तर बाकीचे नेतेही या दसरा मेळाव्यावरून भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दसरा मेळाव्यावरून एक वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आणि राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर सहभाग नोंदवणार का?, असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, दसरा मेळावा हा शिवसेनेचा (Shivsena) आहे. तो वेगळा पक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना दसरा मेळावा घेत आहे. राष्ट्रवादी त्यात काही करणार नाही. तसंच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे, त्यांचे नेते यात सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये पडणार नाही.

राज्यात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत. पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी, आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पाहावं, असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच, भाजप पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला जाणार का?, असा सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा कोणत्याही बाजूने आमंत्रण आले तर नक्कीच उपस्थित राहू. मात्र उद्धव ठाकरे मला आमंत्रण देणार नाहीत याची मला खात्री असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!