🕒 1 min read
मुंबई : ‘मराठा समाजासाठी जीवाचे रान करणारे, नंतर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा आरक्षण समन्वयक व शिवनेरी वर मुख्यमंत्री यांचे हेलीकॅप्टरवर मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी दगडफेकणारे “शिवरायांचे मावळे असलेले बापू संपुर्ण महाराष्ट्राला माहित आहेत.
सामान्य कार्येकर्ता ते एक “झुंजार सेनापती “ हा प्रवास संपुर्ण बहुजन चळवळीतील लढवय्या शांताराम बापू कुंजीर यांचे काल अल्पशा आजारांने निधन झाले आहे.
पिंपरी-चिंचवड मधील निगडी प्राधिकरण येथील ‘लोकमान्य हॉस्पिटल’मध्ये १६.४ ते २२.४.२०२० पर्यंत ते ॲडमीट होते. डाव्या हाताला मुंग्या येणे, पायात कमजोरी येणे, तोल जाने हे गेली ६, ७ महिने त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांचे ॲापरेशन करण्यात आले. ‘मी आता बरा आहे, ॲापरेशन छान झाल् आहे,’ अशी फेसबुक पोस्ट त्यांनी स्वत: केली होती.
मात्र यानंतर काल शांताराम बापू कुंजीर यांना जहांगिर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. त्यानंतर बापूची तब्येत गंभीर होत गेली. लगेच डॉक्टरांनी ह्रदयाचे ॲापरेशन करण्याचा निर्णय घेतला तरी सुध्दा त्यास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे अल्पशा आजाराने मध्यरात्री त्यांचे निधन झाले आहे.


