Share

अहमदनगरमध्ये शंकरराव गडाख घडवणार राजकीय भूकंप!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत आहे. याची सुरुवात ते श्रीगोंदा तालुक्यातून करणार आहे. पुढील आठवड्यात माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते व अन्य दहा-बारा कार्यकर्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी राजेंद्र म्हस्के व वैभव पाचपुते यांनी सोनईत शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी भानगावचे शरद कुंदाडे यांनी मध्यस्थी केली आहे. प्रशांत गडाख यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या कानावर हा विषय घातला असून, पुढील आठवड्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे समजते.

अहमदनगर जिल्ह्याची शिवसेनेची सर्व सूत्र शंकरराव गडाख यांच्याकडे आल्यापासून त्यांनी जिल्ह्यात गडाख पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून राजेंद्र म्हस्के व वैभव पाचपुते नाराज असल्याचे दिसत होते. अखेर आता ते शिवबंधन बांधणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

सोमवारी काँग्रेसच्या कार्यसमितीची महत्वाची बैठक ; सोनिया गांधी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार?

महाविकास आघाडीचे मंत्री आमने-सामने; बच्चु कडूंच्या ‘प्रहारा’वर कृषीमंत्री दादा भुसेंचे प्रत्युत्तर

भीमा सहकारी साखर कारखान्यात तयार झालेली तब्बल १ लाख पोती गायब झाल्याचा संशय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!