🕒 1 min read
पुणे – घराशेजारी राहणा-या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या 42 वर्षीय नराधमास राजगड पोलिसांनी अटक केली. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून याप्रकरणी बळीराम देवीदास जावळे (वय-42) यांच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी आई-वडिलांसोबत खेड-शिवापूर येथील वेताळवस्तीत राहते. आरोपी त्यांच्या घराजवळच राहण्यास असल्याने त्याची पीडित मुलीशी ओळख होती. त्याने पीडितेला पैसे देण्याचे आमिष दाखवून घरात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, रात्री या मुलीच्या पोटात दुखत असल्याने फिर्यादींनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दुस-या दिवशी पीडित मुलीच्या पालकाने आरोपीला मारहाण करून जाब विचारत असताना हा प्रकार गावातील इतर नागरिकांना समजला. काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आरोपीला पकडण्यात आले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

