🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांनी पुलवामात केलेल्या नापाक हल्ल्यानंतर देशभरात जबरदस्त संताप आहे. ठिकठिकाणी निषेध मोर्चे सुरु असून बॉलीवूडने सुद्धा पाकिस्तानी कलाकारांनाही भारत बंदी केली आहे. एवढच नाही तर आता भारतीय हॅकर्सनीही पाकिस्तानवर ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. पाकमधील 200 हून अधिक वेबसाईट या हॅकेर्सने हॅक केल्या आहेत. यामध्ये पाकिस्तान सरकारच्या देखील काही वेबसाईट्सचाही समावेश आहे.
भारतीय हॅकर्सने पाकिस्तानवर मोठा ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’ करताना पाकिस्तानमधील २०० वेबसाईट्स हॅक केल्या आहेत. भारतामधील ‘टीम आय क्रू’ या गटाने हा सायबर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. हॅक झालेल्या साईट्सवर या गटाचे नाव झळकताना दिसत आहे. तसेच पेटती मेणबत्ती आणि भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तिरंग्याच्या रंगात उडताना दिसत आहे. हॅक केलेल्या वेबसाईट्सची यादीच सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करण्यात आली असून यामध्ये पाकिस्तानमधील काही सरकारी वेबसाईट्सही आहेत.
हॅक केलेल्या वेबसाईटवर भारतीय हॅकर्सने, ‘आम्ही १४/०२/२०१९ कधीही विसरणार नाही’, ‘पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना समर्पित’ अशा प्रकारचे संदेश पोस्ट केले आहेत. तसेच ‘१४/०२/२०१९ चा हल्ला आम्ही विसरणार नाही. पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्या वीर जवानांना आम्ही आदरांजली वाहतो. आम्हाला माफ करा ?, आम्ही विसरून जाऊ ?, भारत हा हल्ला कधीही विसरणार नाही. तुमच्यानुसार, देशभक्ती-युद्ध-जिहाद- शिट’ असे मेसेजही हॅकर्सनी पोस्ट केले आहेत. तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणारे मेसेजेसही या वेबसाइटवर दिसत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

