Share

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सातशे कोटीचे कर्ज होणार माफ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना सातशे कोटी रूपयांची कर्ज माफी मिळणार आहे. कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने अल्पसा पाऊस होत आहे. त्यातच रासायनिक खते, बीयाणांच्या वाढलेल्या किंमती यामुळे शेतकऱ्यांना शेतीव्यवसायात फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे. संपूर्ण शेती व्यवसायच आर्थिक अडचणीत सापडला आहे. प्रंचड झालेल्या कर्जामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कुंटुबियांचा उदर्हनिर्वाह करणे कठीण झाले होते.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी केली जात होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. शेतकरी वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत असून जालना जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना तब्बल सातशे कोटी रुपयांची पीक कर्जमाफी मिळणार आहे.

जालना जिल्ह्यात विविध बॅंकामधून सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीच्या निर्णयामुळे जिल्यातील ज्या शेतकर्यांनी 30 संप्टेबर 2019 पर्यंत पीक कर्ज घेतले आहे ते सर्व पीक कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी पुनर्गठन करून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच एक विशेष योजना सरकार आणणार.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1209093367985926144?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209091925023657985?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!